देशाची उन्नतीसाठी उच्चशिक्षित व्हा: श्री. आयुष प्रसाद साहेब
जळगांव:
शहरात जिल्हाधिकारी काऱ्यल्याचा आवारात जिल्हा नियोजन समिती हॉल मध्ये दिनांक ६/१०/२०२४ रोजी दुपारी १ वाजता अल्पसंख्यक युवक संसदचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन उत्तर महाराष्ट्र समनवयक शिबान फाईज यांनी केले. अध्यक्ष स्थानी अल्पसंख्यांक युवक संसदचे राष्ट्रीय समनवयक हाजी जुबेर मेमन (पुणे) होते तर पेनालिस्ट व प्रमुख अतिथी म्हणून जळगांव जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद, जळगांव शहराचे आमदार राजू मामा भोळे, रा.का. पार्टीचे श्रीराम पाटील, जळगांव एम आय एमचे जिल्हा अध्यक्ष अहमद हुसेन, डॉक्टर परवेज अश्रफी ( अहमद नगर), डॉक्टर रफीक काजी, रा. का. पार्टीचे फिरोज शेख व सामाजिक कार्यकर्ता अर्शद शेख उपस्थित होते. या कार्यक्रमात मुस्लिम शीख, जैन, ख्रिश्चन, दलीत व आदिवासी समाजाचे विद्यार्थी मोठे संख्यात उपस्थित होते.यावेळी विद्यार्थ्यांनी पेनालिस्टला शैक्षणिक, राजकीय, स्वास्थ्य, क्रीडा व इतर विषयांवर प्रश्न विचारले असता मान्यवरांनी त्यांना समाधानकारक असे उत्तर दिले. यावेळी जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद यांनी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचे महत्व पटवून दिले तर जळगांव शहराचे आमदार राजू मामा भोळे यांनी सदैव माणुसकी जपा असे सांगितले तसेच विद्यार्थ्यांना सर्व तो परी मदतीचे आश्वासन दिले. श्री राम पाटील साहेबांनी विद्यार्थ्यांना म्हंटले की संघर्ष शिवाय पर्याय नाही. एम आय एमचे जिल्हा अध्यक्ष अहमद हुसेन यांनी देश हीता साठी सदैव प्रयत्न करावे असे संबोधले. कार्यक्रमाचा अध्यक्षीय भाषणात राष्ट्रीय समन्वयक हाजी जुबेर मेमन यांनी लवकरच राज्य पातळीवर असे कार्यक्रम आयोजित करण्याचे जाहीर केले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन कासिम उमर यांनी केले तर साहिल शेख, नासीर सय्यद, जुबेर शेख, साजिद शेख, उमर शेख यांनी परिश्रम घेतले.
One thought on “अल्पसंख्यांक युवक संसदचे थाटात आयोजन”