जळगाव। येथील ईकरा शिक्षण संस्था संचलित एच जे थीम कला व विज्ञान महिला महाविद्यालय मेहरून जळगाव येथे महिला विद्यार्थी विकास विभाग तर्फे “महिला आरोग्य संवर्धन ऋतुमती अभियान” अंतर्गत व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. मु. जे.महाविद्यालयातील प्राध्यापिका डॉक्टर सोनल महाजन यांनी “आरोग्य आणि निसर्गोपचार” या विषयावर व्याख्यान दिले. डॉक्टर शबाना खाटीक यांनी परिचय करून दिला. तसेच प्राध्यापक डॉक्टर अंजली कुलकर्णी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. प्राध्यापक डॉक्टर कहेकशा अंजुम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इकरा महाविद्यालयात आरोग्य आणि निसर्गोपचार या विषयावर व्याख्यान
