जळगांव: येथील एच.जे. थिम कॉलेज जळगाव राष्ट्रीय सेवा योजना एककाद्वारे “स्वच्छता हीच सेवा” या उपक्रमांतर्गत आज दिनांक ३०/०९/२०२४ रोजी आरोग्य , स्वच्छ्ता आणि लसीकरण या विषयावर प्रा . डॉ. ओंकार साळुंके मु.जे.महाविद्यालय, जळगाव यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. आपल्या व्याख्यानातून डॉ.ओंकार साळुंके यांनी आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छता आणि लसिकरण कसे महत्त्वाचे आहे हे पटवून दिले.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.चांद खान उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. तन्वीर खान यांनी
कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. उमर खान यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.नसरीन खान यांनी केले.या प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आणि कॉलेजचे विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इकरा येथे ‘आरोग्य, स्वच्छता आणि लसिकरणा चे महत्त्व’ या विषय वर व्याख्यान
