जळगाव: २२ सेप्टेंबर
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि इकरा एच.जे. थिम कॉलेज जळगाव राष्ट्रीय सेवा योजना एकक यांच्या संयुक्त विद्यमाने “स्वच्छता हीच सेवा” या उपक्रमांतर्गत आज दिनांक २२/०९/२०२४ रविवार रोजी सकाळी राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांच्या माध्यमातून जळगाव बस स्थानक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर आणि जे. एस.ग्राउंड परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
*माय भारत स्वच्छता ही सेवा पंधरवडा अंतर्गत थिम कॉलेजच्या २५ स्वयंसेवकांनी आज विद्यापीठाचे प्र कुलगुरु प्रा. एस टी इंगळे, कुलसचिव डॉ विनोद पाटील, एन एस एस चे संचालक प्रा. सचिन नांद्रे, महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.चांद खान, कार्यक्रमाधिकारी डॉ. तन्वीर खान, सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ.शेख हाफिज, प्रा.डॉ.राजू गवारे, यांच्या उपस्थितीत जळगाव येथील एस.टी. बस स्थानक येथे स्वच्छते विषयी शपथ घेऊन स्वच्छते विषयी जनजागृती करण्याची हमी दिली.
