मुजफ्फरपुर येथील नेहा पब्लिक स्कूल मधील प्राचार्य तृप्ती त्यागी यांनी एका मुस्लिम मुलाला शाळेतील इतर हिंदू मुलांच्या हस्ते मारहाण केल्याबद्दल समाज माध्यमावर सदरची व्हिडिओ क्लिप प्रसारित झाली आहे.
भारतात तसेच भारताबाहेर शिक्षण क्षेत्रातील या जातीवादी वृत्तीचा निषेध करण्यात येत आहे त्याच धर्तीवर आज जळगाव शहरातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या मुस्लिम संघटनांच्या प्रतिनिधींनी सुद्धा या प्रकाराचा तीव्र निषेध करून आपल्या भावना महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्म, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी,महिला व बाल कल्याण मंत्री स्मृती इराणी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी व भारताचे मुख्य न्यायाधीश माननीय चंद्रचूड यांना एका निवेदनाद्वारे व्यक्त केले आहे.
निवेदनातील प्रमुख मागण्या
शिक्षिका व प्राचार्य असलेली तृप्ती त्यागी हीच्याविरुद्ध १)भारतीय दंडविधान कायदा १५६ व २९५ तसेच हेट क्राईमचा गुन्हा सोबत व बाल न्याय अधिनियम २०१५ च्या कलम ७५ प्रमाणे बालकांचा छळ केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात येऊन तिला अटक करावी व तीस दिवसाच्या आत दोषारोपण पत्र सादर करून कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
२)या शिक्षिकेच्या मागे असलेल्या मानसिकतेचा खरा शिक्षक कोण त्याची तपासणी व्हावी व त्याला सुद्धा भादवी १२०”ब” प्रमाणे गुन्हा दाखल करावा.
३) ज्या लहान बालकाला मारहाण करून तिची मानसिकता नकारात्मक केली तो पुढे अतिरेकी होऊ नये म्हणून त्याच्यावर भारत सरकारने वा उत्तर प्रदेश सरकारने त्याची शिक्षा पूर्ण करण्यासाठी त्या विद्यार्थ्याला दत्तक घ्यावे.
अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
निवेदनावर यांच्या होत्या स्वाक्षऱ्या व उपस्थिती
सदर निवेदन उपजिल्हाधिकारी श्रीकुमार चिंचकर यांना कुल जमातीचे अध्यक्ष सय्यद चांद यांच्या हस्ते देण्यात आले यावेळ मणियार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक चे अध्यक्ष मजहर पठाण, काँग्रेसचे महानगर अध्यक्ष अमजद पठाण, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे महानगर अध्यक्ष जाकिर पठाण, मुस्लिम ईदगाह ट्रस्टचे सचिव अनिस शाह, राष्ट्रवादी काँग्रेसचे मीडिया प्रमुख सलीम इनामदार, आफताब फाउंडेशनचे सादिक खान मुलतानी व हाशिम खान मुलतानी, राष्ट्रवादी महानगर सचिव अकील पटेल,
इमदाद फाऊंडेशन चे मतीन पटेल, उस्मानिया चे अब्दुल अजिज, एमआयएम पार्टीचे अध्यक्ष अहमद सर, बी वाय एफ चे अध्यक्ष शिबान फाइझ, शिकलगर फाउंडेशनचे अध्यक्ष अन्वर खान, युवक काँग्रेसचे बाबा देशमुख, मुक्ताईनगर चे जाफरली, अडावद चे पत्रकार फारुक नुमानी, हुप्फाझ फाउंडेशनचे हाफिज रहीम पटेल, नुरी फाउंडेशनचे नाजिम पेंटर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

उप जिल्हाधिकारी श्रिकुमार यांना निवेदन देताना सैयद चांद, फारुक शेख,अनिस शाह,सादिक खान आदी दिसत आहे.